हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे स्पॅडेक्स 30 डिसेंबर 2024 ला लाँच केले जाणार आहे. हे मिशन आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री 9.58 वाजता प्रक्षेपित होईल. स्पॅडेक्स मिशनद्वारे हिंदुस्थान हा स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान असलेला जगातील चौथा देश बनणार आहे. याआधी रशिया, अमेरिका आणि चीनने स्पेस डॉकिंगमध्ये यश मिळवले आहे. या मोहिमेद्वारे इस्रो अवकाशात वनस्पतींच्या पेशी कशा वाढतात याचे संशोधन करणार आहे. पीएसएलव्ही-सी60 रॉकेट स्पॅडेक्स मोहिमेद्वारे प्रत्येकी 200-200 किलो वजनाचे दोन अंतराळ यान घेऊन जाईल. यांना चेसर आणि टार्गेट असे नाव देण्यात आले आहे. संशोधन आणि विकासाशी संबंधित 24 पेलोडदेखील या वेळी पाठवले जाणार आहेत. हे पेलोड पृथ्वीपासून 700 किमी उंचीवर डॉक केले जातील. यापैकी 14 पेलोड्स इस्रोचे आहेत आणि उर्वरित 10 स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांचे आहेत, असे इस्रोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पेस डॉकिंग म्हणजे काय?
स्पेस डॉकिंग म्हणजे अंतराळात दोन स्पेसक्राफ्ट जोडणे. ही प्रक्रिया म्हणजे आकाशातील दोन कार जोडण्यासारखी आहे. स्पेसेक्स मिशन प्रथम स्पेसक्राफ्ट चेझरला दुसऱ्या अंतराळ यानाच्या लक्ष्याशी कसे वाहतूक आणि कनेक्ट करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवेल. हे काम अतिशय बारकाईने केले जाईल, कारण अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते आणि सर्व काही वेगाने हलते. डॅकिंग केल्यानंतर मात्र वाहने एकत्र काम करू शकतील.
एकाच वेळी संशोधन
या संशोधनांतर्गत अवकाशात आणि पृथ्वीवर एकाच वेळी प्रयोग केले जाणार आहेत. पालक वनस्पतीच्या पेशींना सूर्यप्रकाश व पोषक तत्त्वे यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी एलईडी लाईट्स आणि जेलच्या माध्यमातून पुरवल्या जातील. पॅमेरा वनस्पती पेशींचा रंग आणि वाढ रेकॉर्ड करेल.