
भारतीय लष्करी अकादमीमध्ये (आयएमए) 92 वर्षांत प्रथमच महिला कॅडेट्सची एक तुकडी सामील होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महिलांसाङ्गी भारतीय लष्करी अकादमीचे दरवाजे उघडले आहेत. पहिली तुकडी जुलै 2025 पासून देहरादून येथील आयएमएमध्ये सामील होईल.
न्यायालयाने महिलांसाठी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे (एनडीए) दरवाजे उघडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महिलांना एनडीएमध्ये प्रवेश मिळण्यास तीन वर्षांपूर्वीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता एनडीएमधील महिला कॅडेट्स पुढील प्रशिक्षणासाङ्गी आयएमएमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण घेतील आणि अधिकारी बनतील. विशेष म्हणजे आयएमए ही देशातील एकमेव लष्करी अकादमी आहे, जिथे आतापर्यंत महिलांना प्रशिक्षण दिले जात नव्हते. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ऐतिहासिक बदल झाला. सध्या 126 महिला कॅडेट्स एनडीएमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. यापैकी 18 कॅडेट्स त्यांच्या अंतिम वर्षात असून 8 जणींनी सैन्यात भरती होण्याचा पर्याय निवडला आहे. या 8 महिला कॅडेट्स आयएमएमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण घेतील.
स्वतंत्र निवास व्यवस्था
भारतीय लष्करी अकादमीमध्ये महिला कॅडेट्ससाठी स्वतंत्र निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रशिक्षणासाठी त्यांना पुरुष सहकाऱ्यांसह वेगळ्या कंपन्यांमध्ये नियुक्त केले जाईल. आयएमएच्या अधिकाऱ्यांनी विविध पैलूंची माहिती घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए), एअर पर्ह्स अकादमी आणि इंडियन नव्हल अकादमी यासह अनेक प्रशिक्षण अकादमींना भेटी दिल्या.
इतर अकादमींप्रमाणे प्रशिक्षण
ओटीएमध्ये 30 वर्षांहून अधिक काळ महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अनु सिंग रंधावा (निवृत्त अधिकारी) यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, ओटीएमध्ये ज्या प्रकारे महिलांना प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे आयएमएमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. महिलांच्या विशिष्ट गरजादेखील लक्षात घेतल्या जातील. सैन्यात महिलांचे पूर्ण स्वागत आहे हे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होते. महिलांना प्रशिक्षण देण्यात लष्कराला फारसा अनुभव आहे. आयएमए हीच पद्धत स्वीकारेल. जेणेकरून महिलांच्या गरजा पूर्ण केल्या जातील.