मोदीच भाजपला टायटॅनिक जहाजासारखं बुडवणार; डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर

लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीनंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्येही भाजपला जनतेने स्पष्टपणे नाकारल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि कथित करिष्म्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. मोदीच भाजपला टायटॅनिक जहाजासारखं बुडवणार, असा घरचा अहेर डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्यामुळे तर एकच खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कालच ‘अतिआत्मविश्वास’ अशा एकाच शब्दात लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे विश्लेषण केले आहे. आता भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनीही मोदींच्या कथित करिष्म्याचा फुगा फोडला आहे. आम्हा भाजपच्या मंडळींना जर आमचा पक्ष टायटॅनिक जहाजासारखा बुडताना पाहायचा असेल तर त्यासाठी मोदीच हे सर्वोत्तम कप्तान आहेत, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.