
तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौऱ्याचा सपाटा सुरू आहे. विदेश दौऱ्यास जाण्यासाठी त्यांनी जराही खंड पडू दिलेला नाही. मोदींचे एकामागोमाग एक दौरे सुरुच असून या दौऱ्यात ठिकठिकाणी उत्साहाने स्वागतही केले जाते. लोक मोदी… मोदी… ओरडतात आणि पंतप्रधान त्यांची भेट घेतात याचे व्हिडीओही पीएमओ कार्यालयाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केले जातात. मात्र या गर्दीसाठी मोदी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे उघड झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी जुलै आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये रशियाला गेले होते. 22 व्या हिंदुस्थान-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी रशियात पोहोचले होते. जुलै महिन्यात झालेल्या या दौऱ्यावर जवळपास 5 कोटी रुपयांहून अधिक खर्च केले होते. यापैकी जवळपास 2 कोटी रुपये फक्त गर्दी जमवण्यासाठी उधळण्यात आले होते. लोकेश बत्रा यांनी मोदींच्या विदेश दौऱ्याच्या खर्चाचा तपशील माहिती अधिकारातून मागवला होता. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.
नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर जातात त्यावेळी विमानतळ किंवा कार्यक्रमस्थळी गर्दी जमते. हातात बॅनर, झेंडे घेऊन लोक मोदी… मोदी… घोषणा देतात. मोदीही त्यांची भेट घेतात, त्यांच्याशी बोलतात. हा सगळा इव्हेंट मॅनेजमेंटचा प्रकार असून हवी तशी गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. पत्रकार डॉ. मुकेश कुमार यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून याचा तपशील शेअर करत याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
रशिया दौऱ्यावर 15 कोटी खर्च
मोदी सरकारने पंतप्रधानांच्या गतवर्षी झालेल्या रशिया दौऱ्यावर 15 कोटी रुपये खर्च केले होते. यातील 5 कोटी रुपये जुलैमध्ये झालेल्या दौऱ्यावर, तर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दौऱ्यावर 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तसेच अबुधाबी दौऱ्यावरही 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
दोस्तों….ये आँकड़े देखिए और समझने की कोशिश कीजिए कि प्रधानमंत्री मोदी की विदेश यात्रा के दौरान जो बंदर पार्टी मोदी मोदी चिल्लाते हुए दिखती है वह कैसे जुटाई जाती है।
ये सब इवेंट मैनेजमेंट है। मनचाही भीड़ जुटाने के लिए पैसे खर्च किए जाते हैं। पब्लिक झांसे में आ जाती है और मान… pic.twitter.com/trHzrWAERv— Dr. Mukesh Kumar (@mukeshbudharwi) February 27, 2025
साडे चार वर्षात 66 अब्ज खर्च
दरम्यान, गेल्या साडेचार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि जाहिरातींवर तब्बल 66 अब्ज खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. मोदींचा परदेश दौरा आणि सरकारी जाहिरातींवर तब्बल 6 हजार 622 कोटी खर्च झाले. यात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर 2 हजार कोटींहून अधिक खर्च झाले, तर सरकारी धोरणांशी निगडित जाहिरातींवर तब्बल 4 हजार 607 कोटी रुपये खर्च झाले. ही माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनीच राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली होती.
एकूण परदेश दौरे – 84
खर्च – 2 हजार कोटी
सर्वाधिक 5 वेळा अमेरिका दौरा
सरकारी जाहिरातींवर 4 हजार 607 कोटींचा खर्च
अबब! मोदींचे परदेश दौरे आणि जाहिरातबाजीवर तब्बल 66 अब्ज रुपयांचा चुराडा!!