नरेंद्र मोदी आता ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’वर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी जोडले गेले आहेत. ‘ट्रुथ सोशल’ हे ट्विटरप्रमाणे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर युजरला पोस्ट, व्हिडियो, फोटो शेअर करता येतात. मोदींच्या ‘ट्रुथ सोशल’ अकाऊंटला अल्पावधीत फॉलोअर्स मिळाले आहेत. ट्रुथ सोशल जॉईन केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिली पोस्ट लिहिली. मोदींनी पोस्टमध्ये लिहिलंय, ट्रुथ सोशलवर आल्याचा आनंद आहे. येथील सर्व उत्साही लोकांशी जोडण्यासाठी आणि अर्थपूर्ण संभाषणामध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. अन्य एका पोस्टमध्ये मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले. ट्रम्प यांनी मोदी आणि फ्रीडमन यांचा पॉडकास्ट शेअर केल्याबद्दल आभार मानले.