गुजरात एटीएस, नौदल आणि एनसीबी अर्थात अमली पदार्थ नियंत्रण विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या समुद्रात पोरबंदरजवळ तब्बल 700 किलोचे मेथाम्फेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत तब्बल अडीच ते साडेतीन हजार कोटी असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱयांनी दिली. या कारवाईत 8 इराणी नागरिकांनाही अटक करण्यात आली असून हे ड्रग्ज इराणी जहाजातून आणण्यात येत होते. एनसीबीला समुद्रात एक अनोळखी जहाज दिसून आल्याची आणि त्यातून मोठय़ा प्रमाणावर ड्रग्ज आणण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सागर मंथन-4 ही मोहीम राबवण्यता आली.