75 लाख रुपये किमतीचे सिगारेट, कॅप्सूल जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने ड्रग्ज तस्करांना चांगलाच दणका दिला आहे. कारवाई करून विविध ब्रॅण्डच्या 2 लाख 44 सिगारेट्स आणि 74 हजार कॅप्सूल जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 75 लाख रुपये आहेत. याप्रकरणी दोन कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपन्यांची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एनसीबीला हिंदुस्थानातून अवैधरीत्या औषध खरेदीमध्ये गुंतलेल्या सिंडिकेटची माहिती मिळाली होती. अवैध वस्तूंचा साठा एअर कार्गोच्या माध्यमातून लंडनला पाठवला जात होता.