नंदुरबार जिल्ह्यात एका शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार आणि पॉर्न दाखवल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपी, जो शाळेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता, त्याला भादंवि आणि POCSO कायद्याच्या संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली.
विद्यार्थिनीने तिच्या पालकांना सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. शाळेच्या आतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी विद्यार्थिनीला आपला फोन देताना दिसला आहे.
या घटनेची दखल घेत शाळा प्रशासनानेही आरोपी सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे.
या घटनेबाबत बोलताना नंदुरबारचे पोलीस अधीक्षक म्हणाले की, ’27 ऑगस्ट रोजी नंदुरबारमधील एका शाळेत एक घटना घडली होती. शाळेत काम करणाऱ्या एका व्यक्तीने एका अल्पवयीन शाळकरी मुलीला त्याच्या फोनवर अश्लील व्हिडीओ दाखवले. आज या विद्यार्थिनीची कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्वरीत कारवाई करत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे’.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी पोलीस करत आहेत, असे पोलीस अधीक्षक म्हणाले.
याआधी बदलापूरला एका आदर्श शाळेत एका पुरुष कर्मचाऱ्याने बालवाडीतील दोन मुलींच्या लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली होती. या घटनेवरून राज्यासह देशभरातील मोठा निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले.