
राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये चार दिवसांपासून भीषण उष्णता जाणवत आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह पश्चिम महाराष्ट्रातही उष्म्याने कहर केला असून कित्येक जिल्ह्यांतील तापमान विक्रमी 50 अंशांच्या दिशेने झेपावले आहे. ठिकठिकाणी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाल्याने नागरिकांची प्रचंड दमछाक झाली आहे. गुरुवारी नंदुरबारमध्ये सर्वाधिक 45.3 अंश तापमानाची नोंद झाली. तसेच अकोला, जळगावचा पारा 44 अंशांच्या घरात गेला. हवामान खात्याने काही भागांत अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.