नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच महायुती सरकारने राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नंदिनी आवाडे यांची नियुक्ती केली आहे तर महेश आव्हाड यांची हाफकिन बायोफार्मा कॉर्पोरेशनच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले होते. हे अधिवेशन आज शनिवारी संपले. अधिवेशन संपताच राज्य सरकारने 23 सनदी अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या- नियुक्त्या केल्या. यामध्ये अनेक अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
- महेश विश्वास आव्हाड यांची व्यवस्थापकीय संचालक, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशन, मुंबई येथे नियुक्ती.
- वैदेही मनोज रानडे यांची सह व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई येथे नियुक्ती.
- विवेक बन्सी गायकवाड यांची सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती.
- नंदिनी मिलिंद आवाडे यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई येथे नियुक्ती.
- वर्षा मुपुंद लड्डा यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (मुंबई) व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती.