Nanded News – गळ्यात नोटांचा हार घालून महिला सरपंचाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, काय आहे प्रकरण?

नांदेड तालुक्यातील इंजेगाव येथील महिला सरपंच मुक्ताई पंचलिंगे गळ्यात नोटांचा हार घालून जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. जिल्हा परिषद कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कुठलेही काम होत नसल्याने अखेर त्यानु हे आंदोलन सुरु केलं आहे. पैसे दिल्याशिवाय कुठलंही काम जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकारी करत नाहीत, असा आरोप सरपंच मुक्ताई पंचलिंगे यांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताई पंचलिंगे यांनी अनेकवेळा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी निवेदन दिली. पण त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. यातच त्यांनी गळ्यात नोटांचा हार घालून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

काय आहे त्यांच्या मागण्या?

1) नांदेड पचायत समिती येथे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी मिळत नाही.
2) मोडकळीस असलेली रूम पाडण्यासाठी मंजुरी मिळत नाही जि.प. नांदेड.
3) नांदेड पंचायत समिती जनावरांचे गोठे व विहीर या कामास वर्क ऑर्डर मंजुरी मिळत नाही.
4) माझे गावातील ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे 3 गावे आहेत.
5) पा.पु. उपअभियंता देशमुख यांनी मनमानी कारभार करून जे.जी.एम. कामास स्थगिती दिली आहे
6) गावामध्ये समशान भुमी नाही
7) गावामध्ये अंगणवाडी इमारत नाही.
8) MREGS अंतर्गत सी.सी. रोड कामास work Order मिळत नाही.
9) MREGS इंजेगाव येथील कुशल फाईली वरिष्ठ कार्यालयात दाखल होत नाही.
10) इंजेगाव MREGS कायमस्वरुपी APO मिळत नाही व अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार.

या त्यांच्या प्रमुख दहा मागण्या आहेत.