पदव्यांच्या छपाईअभावी पीएच.डी.धारक पदवीपासून वंचित

पीएच. डी. झालेल्या स्नातकांना आज बुधवारी नदिडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवीपासून बंचित रहावे लागले. दोन महिलांना पीएच.डी.ची पदवी पेण्यासाठी आमंत्रित केले, मात्र त्यांच्या पदव्या छपाई न झाल्याने त्यांना या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ही पदवी घेता आली नाही. कार्यक्रमात विद्यापीतात नियोजनाचा अभाव दिसून आला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ बुधवार, 29 रोजी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली झाला. दरम्यान, जानेवारी 2024 रोजी दोन महिला संशोधकांनी प्रबंध विद्यापीठाला सादर करून पीएच.डी. प्राप्त केली होती.

या पीएच. डी. धारक महिलांनी 14 जानेवारी रोजी विद्यापीठात दीक्षांत समारंभात पदवी मिळावी यासाठी रीतसर शुल्कसुद्धा भरलेले होते. दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाने संबंधितांना तुमच्या पदव्या प्रिंट झाल्या नाहीत त्यामुळे आज देता येणार नाहीत, असे स्पष्ट केले. त्यावर या महिलांनी मग आमंत्रण कशासाठी दिले? असा सवाल केला. या महिलांनी विद्यापीठाच्या सिनेट मेंबरमार्फत परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ व परीक्षा विभागाशी संपर्क करून दीक्षांत समारंभामध्ये पदवी मिळावी, यासाठी विनंती केली होती. सिनेट मेंबरच्या विनंतीला विद्यापीठाच्या प्रशासनाने धुडकावून लावल्यामुळे विद्यापीठाचे प्रशासन नेमके कोणाचे ऐकते? हा प्रश्न संबंधित पीएच डी धारक महिलांनी उपस्थित केला आहे. यावेळी पत्रकार संतोष कुलकर्णी यांनीही या भोंगळ कारभाराच्या चौकशीची मागणी करत महिलांना झालेल्या त्रासाबद्दल संताप व्यक्त केला.