साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘पुष्पा 2’ सिनेमागृहांमध्ये रिलीज झाला आहे. अॅक्शन आणि भन्नाट कथा ही चाहत्यांची पहिली पसंती बनला आहे. चारही बाजूने सिनेमाचे कौतुक होत असताना आता ‘पुष्पा 2’ ला मोठा झटका बसला आहे.
‘पुष्पा 2’ सिनेमा प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन लीक झाला आहे. हा सिनेमा लिक झाल्याने निर्मात्यांना काय फटका पडू शकतो ते जाणुन घेऊया. चाहते पुष्पा 2 सिनेमाची आतुरतेने वाट पाहच होते आणि सिनेमाच्या प्रदर्शनानंतर त्यांची प्रतिक्षा संपली. चाहते आणि समीक्षकांनी या सिनेमाबाबत सकारात्मक रिव्ह्यू दिले होते. तर दुसरीकडे हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्याने चर्चेत आला आहे.
ईटाइम्सच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा 2’ सिनेमा अनेक पायरसी साइट्सवर लीक झाला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच या सिनेमाची बिनदिक्कत विक्री होत आहे. एचडी 1080p फॉरमॅट ते 240p प्रिंटमध्ये लीक स्वरूपात उपलब्ध आहे.
रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘पुष्पा 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी अपेक्षा आहे. मात्र ऑनलाइन लीकमुळे निर्मात्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. लीक झाल्यामुळे ‘पुष्पा 2’ च्या प्रेक्षकांमध्ये घट होणार आहे आणि याचा थेट परिणाम सिनेमाच्या कमाईवर होऊ शकतो. खरंतर मोठ्या प्रमाणात आगाऊ बुकिंगमुळे दिग्दर्शक सुकुमारचा हा सिनेमा पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करताना दिसू शकतो.