
हिंगोली जिल्ह्यातील शिंदे गटाच्या नगरसेवकाचा अजब कारनामा समोर आला आहे. पत्नीसोबत सुरू असलेल्या वादाचा फायदा घेत नगरसेवकाने आपल्याच मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर स्वतःच नाव बदलून मुलीच्या काकाचे नाव दिले. आधारकार्ड अपडेट करताना हा प्रकार उघडकीस आला. पत्नीच्या तक्रारीनंतर नांदेडच्या इतवारा पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करत नगरसेकासह त्याच्या भावाला अटक केली आहे. दरम्यान या बनावट जन्म प्रमाणपत्राच्या रॅकेटमध्ये अनेकजण अडकण्याची शक्यता आहे. राहुल दंतवार अस नगरसेवकाच नाव आहे.
राहुल दंतवार हे औंढा नगर पंचायतीचे शिंदे गटाचे विद्यमान नगरसेवक आहेत. 2011 साली त्यांचा नांदेडच्या रेणुका उरकंडे हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना दिव्यांनी आणि रिद्धी अशा दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचा जन्म नांदेड येथे झाला. या बाबत दोघांच्या जन्माची नोंद नांदेड महापालिकेत आहेत. दरम्यान राहुल आणि त्यांची पत्नी रेणुका यांच्यात कौटुंबिक वाद होतं होता. पती सह सासरच्या मंडळीकडून मानसिक त्रास होत असल्याने रेणुका या नांदेड येथे माहेरी राहायला आल्या. याच दरम्यान नगरसेवक पतीने दोन नंबरच्या रिद्धी या मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर स्वतःचे नाव बदलून आपल्या भावाचे म्हणजेच सचिन दंतवार याचे नाव दिले. बनावट प्रमाणपत्र देखील त्याने काढले. रेणुका जेव्हा मुलीचे आधार कार्ड अपडेट कारणासाठी गेली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. हॉस्पिटल आणि महापालिकेत ही नावामध्ये खाडाखोड केल्याचे समोर आले. याबाबत जाब विचारल्यानंतर पतीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे. शिवाय महापालिकेकडून उडवा उडवीचे उत्तर दिले जातं होते. दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्नीने नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात नगरसेवक पती राहुल दंतवार आणि दिर सचिन दंतवार या दोघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून न्यायालयाने दोघांना 24 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तिसरं अपत्य लावण्यासाठी खटाटोप, पत्नीचा आरोप
दरम्यान नगरसेवक राहुल दंतवार यांचे एका महिलेसोबत संबंध आहेत. त्या महिलेला एक मुलगी आहे. त्यामुळे नगरसेवक पद टिकवण्यासाठी मुलीच्या जन्म प्रमाणपत्रावर स्वतःच नाव बदलून मुलीच्या काकाचे नाव दिले. परस्पर हा कारनामा केला आहे. आपलं पद साबूत रहावे यासाठी पतीने कारनामा केला आहे असा आरोप पत्नीने केला आहे.