निवडणूक आयोगाच्या मदतीने मतमोजणीत घोटाळे करून महाराष्ट्रात जनतेच्या मतांची चोरी करणारे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. महाराष्ट्राच्या माथी पुन्हा गुजरातधार्जिणे सरकार बसले, असा जोरदार हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. नव्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावू नये, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिला.
नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे व अजित पवार यांना या सरकारमध्ये फारसे महत्त्व दिले जाईल असे वाटत नाही. दिल्लीत वाऱ्या करून मंत्रीपदांची भीक मागण्याची वेळ या दोघांवर आली. शिंदे यांची तर भाजपला आता काहीच गरज नाही, त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे यांना भाजप व मोदी-शहांनी जागा दाखवून दिली आहे, असे पटोले म्हणाले. भाजपने पुन्हा एकदा दोन प्रादेशिक पक्षांना संपवले आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.