शेतकरी नव्हे, महायुती सरकार भिकारी

भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱयाला अतिरेकी, नक्षलवादी असे म्हणून त्यांचा अपमान केला. आता राज्यातील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱयांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. पण शेतकरी भिकारी नाही तर शेतकऱयांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे भाजप महायुतीचे सरकारच भिकारी आहे, अशी जळजळीत टीका प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी आज केली.