मीराबाई पटोले यांचे निधन

मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या त्या आई होत. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी भंडारा जिह्यातील सुकळी या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाबद्दल सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.