![NANA PATOLE(1)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/04/NANA-PATOLE1-696x447.jpg)
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी फेस स्कॅन यंत्रणा राबवली गेली, पण ही यंत्रणा बंद पडल्याने कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला. फेस स्कॅन यंत्रणेचा खेळ फसवा आहे आणि मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय करण्याचा डाव आहे अशी टीका कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
एक्सवर पोस्ट करून नाना पटोले म्हणाले की, मंत्रालयात या आठवड्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे, याप्रमाणे चेहरा ओळखल्याशिवाय कुणीही मंत्रालयात प्रवेश करु शकत नाही, याच यंत्रनेमुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून मंत्रालयाबाहेर कर्मचाऱ्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, आणि सामान्य नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
खरतर जनतेला सत्ताधाऱ्यांकडून दूर ठेवण्याचा आणि लोकशाही प्रक्रियेपासून सामान्य जनतेला रोखण्याचा हा सरकारचा प्रयत्न दिसत आहे. जेणेकरून बिल्डर आणि बड्या उद्योगपतींना राज्यातल्या जमिनी आणि संपत्ती देता यावी. बिल्डरांच्या गाड्या बिनदिक्कतपणे मंत्रालयात येत आहेत पण सामान्यांची मात्र अडवणूक सुरु आहे. या व्यवस्थेतील ढिसाळपणा आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यामुळे कर्मचारी, अधिकारी आणि सामान्य नागरिकांची रोज तारांबळ उडत आहे, त्यामुळे सरकारने तातडीने या गोष्टींची दखल घ्यावी आणि प्रवेश प्रक्रिया सुलभ करण्याकरिता तात्काळ जुनी पास मंजुरी व्यवस्था लागू करावी अशी मागणीही पटोले यांनी केली.
फेस स्कॅन यंत्रणेचा फसवा खेळ!
मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय करण्याचा डाव!
मंत्रालयात या आठवड्यापासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे, याप्रमाणे चेहरा ओळखल्याशिवाय कुणीही मंत्रालयात प्रवेश करु शकत नाही, याच यंत्रनेमुळे गेल्या दोन तीन…
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 5, 2025