काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका असे वादग्रस्त विधान भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केले होते. त्यावर भाजपवाल्यांना राज्य विकत घेतलेले नाही असे उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. तसेच हे पैसे सरकारी तिजोरीतून दिले जात आहे असेही पटोले म्हणाले.
एक्सवर पोस्ट करून नाना पटोले म्हणाले की, भाजपवाल्यांनो तुम्ही राज्य विकत घेतलेले नाही. खासदार धनंजय महाडिक ‘लाडकी बहिण’ योजना सरकारी आहे, महिलांना तुमच्या खिशातून नव्हे तर सरकारी तिजोरीतून पैसे दिले जात आहेत. माझ्या महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी महिला स्वाभिमानी आहेत. दीड हजार रुपये देऊन त्यांच्यावर रुबाब करायचा नाही असेही पटोले म्हणाले.
भाजपवाल्यांनो तुम्ही राज्य विकत घेतलेले नाही. खासदार धनंजय महाडिक ‘लाडकी बहिण’ योजना सरकारी आहे, महिलांना तुमच्या खिशातून नव्हे तर सरकारी तिजोरीतून पैसे दिले जात आहेत.
माझ्या महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी महिला स्वाभिमानी आहेत. दीड हजार रुपये देऊन त्यांच्यावर…
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 9, 2024