
गिरगाव येथील अक्कलकोट स्वामी समर्थ मठात येत्या 19 ते 26 एप्रिलदरम्यान अखंड नामस्मरण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत अखंड नामस्मरण, गुरुचरित्र पारायण, स्वामी कृपामृत पारायण होईल. 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता हळदीकुंकू होईल. 26 एप्रिल रोजी नामस्मरण सप्ताह आणि गुरुचरित्र पारायणाची सांगता होईल. या दिवशी आरती, लघुरुद्र, मंत्रजागर, सुश्राव्य कीर्तन, मंत्रपुष्पांजली, स्वामीभक्तांची गायन सेवा, शेजारती असे विविध कार्यक्रम होतील. 27 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखी मिरवणूक निघेल. सर्व भाविकांनी नामस्मरण, श्रवण व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठातर्फे करण्यात आले.