लोकलमध्ये महिलांच्या डब्यात नग्नावस्थेत शिरला, सीएसएमटी-कल्याण एसी लोकलमधील संतापजनक प्रकार; VIDEO

मुंबईतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. येथे एसी लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात एका नग्नावस्थेत शिरलेल्या व्यक्तीने धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सीएसएमटी ते कल्याण एसी लोकलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. हा व्यक्ती डब्ब्यात शिरल्यानंतर महिलांचा एकच गोधळ झाला होता. मात्र टीसीने या व्यक्तीला लोकलमधून बाहेर उतरवलं. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत दिसत आहे की, एसी लोकल फलाटावर थांबली होती. त्याच वेळी हा व्यक्ती नग्नावस्थेत महिलांच्या डब्यात शिरला. हा व्यक्ती डब्यात येताच महिलांनी एकच गोधळ करत आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली. अनेक महिलांनी त्याला डब्यातून बाहेर जाण्यास सांगितलं सुद्धा. मात्र हा व्यक्ती कोणाचेही न ऐकता महिला डब्यात नग्नावस्थेत उभा होता.

सुदैवाने हा व्यक्ती महिला डब्यात शिरला त्यावेळी तिथे टीसीही होते. महिलांनी टीसीला त्याला बाहेर काढण्यास सांगत आरडाओरड केली. त्यावेळी टीसीने या व्यक्तीला धक्का मारत डब्यातून बाहेर ढकललं. घडलेला हा प्रकार अत्यंत संतापजनक होता. यामुळे पुन्हा एकदा लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.