मराठीत बोलणार नाही, माफी मागण्यासही नकार; नाहूर स्थानकावरील रेल्वे कर्मचाऱ्याचा उद्दामपणा

नाहुर रेल्वे स्थानकावर तिकीट खिडकीवरील रेल्वे कर्मचाऱ्याचा उद्दामपणा समोर आला आहे. मराठी बोलणार नाही तसेच माफीही मागणार नाही असे या कर्मचाऱ्याने उद्दामपणे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाहुर रेल्वे स्थानकावर अमोल माने हे प्रवासी तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीवर गेले. त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्याकडे मराठीत तिकीट मागितले. पण रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट देण्याऐवजी वाद घातला. मला मराठी येत नाही, मी मराठीत का बोलू असा उद्दामपणा दाखवला. माने यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मु्ंबईत एकच संतापाची लाट उसळली. या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने तक्रार दाखल केली असून या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे.