लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगांना महिन्याकाठी 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी करत विदर्भ विकलांग संघर्ष समितीद्वारे बुधवारी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे जोरादार आंदोलन केले. या मोर्चामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दिव्यांगाना महिन्याकाठी सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य करावे, दिव्यांगांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य देण्याचा योजनेतील 45 वर्षे अट रद्द करण्यात यावी. अर्थसहाय्याची राशी एकरकमी म्हणजेच ई-रिक्षाच्या किमतीएवढी किंवा किमान 2 लाख देण्यात यावी, प्रत्येक शहर बस स्टॉपच्या बाजूला किमान 648 स्क्वेअरफूटचे अस्थायी व्यवसाय स्टॉल दिव्यांगाकरिता बनवून देण्यात यावे, दिव्यांगानी बनविलेल्या स्टॉलला मान्यता देण्यात यावी, अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.