ईव्हीएम सरकार हाय हाय!

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळाच्या पायऱयांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएमविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘लोकशाही वाचवा-संविधान वाचवा’, ‘ईव्हीएम सरकार हाय हाय’च्या घोषणा देत विधान भवन परिसर विरोधी पक्षाच्या आमदारांनी दणाणून सोडला. यावेळी नाना पटोले, सचिन अहिर, महेश सावंत, विजय वडेट्टीवार, अजय चौधरी, अभिजित वंजारी, नितीन राऊत, विकास ठाकरे, संजय मेश्राम, वरुण सरदेसाई, अमित देशमुख आदी उपस्थित होते.