एका सायकॉलिजस्टने गेल्या 15 वर्षांत 50 हून अधिक मुलींवर बलात्कार केला आहे. या नराधमाचे हे कृत्य असेच सुरू असते. पण एका पिडीत तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली आणि बिंग फुटलं. नागपुरात ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी 47 वर्षीय राजेश ढोकेला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजेश ढोके नागपूर पूर्वमध्ये क्लिनिक चालवयचा. राजेशने भंडारा आणि गोंदियामधील अनेक गरीब मुलींना आपले लक्ष्य करायचा. राजेश ढोके मुलींच्या पालकांना एक कोर्स ऑफर करायचा. हा कोर्स केल्यावर मुली अभ्यासात हुशार होतील आणि त्यांचे अभ्यासात लक्ष लागेल असा दावा करायचा. या कोर्ससाठी ढोके वर्षाला 9 लाख रुपये फीस घ्यायचा असे सांगितले जात आहे.
काऊन्सिंलिंग आणि थेरपीच्या बहाण्याने ढोके मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. या थेरपीमध्ये अॅक्युप्रेशरच्या नावाने ढोके मुलींना स्पर्श करायचा. इतकंच नाही तर कधी कधी थेरपीच्या आधी ढोके मुलींना कोल्ड्रिंकमधून गुंगीचे औषध द्यायचा आणि बलात्कार करायचा. पीडित मुलींनी कुठे तक्रार करू नये म्हणून त्यांचे अश्लील फोटो, व्हिडीओ शूट करायचा. याबाबत कुठे वाच्यता केल्यास फोटे आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा.
नंतर हेच फोटो आणि व्हिडीओ दाखवून हा नराधम मुलींना शारिरीक संबंधासाठी प्रवृत्त करायचा. ढोकेने अशाच प्रकारे एका विद्यार्थिनीला ब्लकॅमेल करत होता. तिचे लग्न झाल्यानंतरही ढोके या मुलीला छळत होता. या मुलीने आपल्या नवऱ्याला विश्वासात घेऊन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि नराधम डोकेला अटक केली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना धक्काच बसला. ढोकेने एकाच नव्हे तर 50 मुलींवर अत्याचार केला होता. ढोकेच्या मोबाईलमध्ये 18 मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ सापडले. यातील बहुतांश मुली या अल्पवयीन होत्या.
या प्रकरणी नागपूर पोलिसांनी चौकशीसाठी विशेष समिती स्थापन केली आहे. ढोकेने अनेक मुलींवर अत्याचार केले आहेत आणि त्यापैकी अनेक मुलींची लग्नही झाले आहेत. त्यामुळे अनेक पीडित मुली तक्रार करत नाहियेत.