
महसूल कर्मचारी संघटनेने आज आपल्या विविध मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूल विभागाचा सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीप्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारीकपात न करता लागू करावा व अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत. महसूल विभागाचा आकृतिबंध तत्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलन केले.
यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय फलके, सरचिटणीस स्वप्नील फलके, उपाध्यक्ष अशोक मासाळ, संतोष झाडे, रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, अशोक मासाळ, वंदना नेटके, दिगंबर करपे, नितीन मुळे, राजेंद्र लाड, शेखर साळुंखे, भरत गोरे, महेश म्हस्के, शारदा आवटी, रूपाली बधे, अजय ढसाळ, ज्ञानेश्वर खोलम, दीपक चन्ने, संतोष धोंगडे, शंकर जगताप, अप्पा खरात, गणेश कोळकर, वैभव साळवे, कृती कदम, माधवी पुंडे, स्वाती फुलारे, सीमा आरगडे, प्रिया धोत्रे, सुषमा उमाप, रासकर, बेल्हेकर, बेंद्रे मॅडम, डावरे मॅडम, ठोंबरे, दातरंगे उपस्थित होते.