भाजप नेत्याचा महिलेसोबतचा अश्लिल संवाद व्हायरल, काँग्रेसची कारवाईची मागणी

उत्तर प्रदेशातील शामली नगरपालिकाचे अध्यक्ष अरविंद संगल यांचा एका महिलेशी अश्लील पद्धतीने बोलल्याचा व्हिडीओ, संभाषणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सांगल एका महिलेशी बोलत आहे आणि संभाषणादरम्यान ती महिला त्याला चुकीच्या गोष्टी बोलण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

महिला आणि पालिका अध्यक्ष यांच्यातील संभाषण सुरू असताना शेजारी उभा असलेला एक व्यक्ती व्हिडिओ बनवला आहे. या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली असून सन्माननीय पदावर असलेल्या व्यक्तीचे हे वर्तन कोणत्या प्रकारचे आहे? असा अनेक प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहे.

पालिका अध्यक्ष यांच्या या अश्लिल वर्तणूकीवर शामलीचे प्रभारी मंत्री दिनेश खाटीक यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. अश्या प्रकारे महिलांशी संवाद साधणाऱ्या दोषीवर कडक कारवाई केली जाईल. मात्र व्हिडीओ व्हायरल होऊन तीन दिवस झाले तरी अद्यापही या प्रकरणी अरविंद सांगल यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

काँग्रेसने सीबीआय चौकशीची मागणी केली

दरम्यान अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी भाजपने आपल्या नेत्यांवर कडक कारवाई करावी, असे लोकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेत्यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.