दुधाला कायम स्वरुपी 40 रुपये भाव मिळावा तसेच शेतकर्यांचे कर्ज सरसकट माफ करण्यात यावे या मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या पार्श्वभुमीवर राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर 2 जूलै 2024 रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाबाबत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी माहिती दिली असून महसूल प्रशासनाला तसे निवेदन देण्यात आले आहे.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे व धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली आज दि. 28 जून 2024 रोजी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, दुधाला 40 रुपये हमीभाव मिळावा, शेतकर्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, शेती कर्जा बाबत होणारी सक्तीची वसूली त्वरीत थांबवीण्याचे आदेश पारीत करावे, दुध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच 40 टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी. दुध भेसळ व काटा मारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधींची भरारी पथके नेमावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 2 जूलै 2024 रोजी राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रवींद्र मोरे यांनी दिली.
यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे, मधुकर घाडगे, सतिष पवार, जुगलकुमार गोसावी, आनंद वने, प्रमोद पवार, सचिन पवळे, सागर पेरणे, नितीन कदम, सचिन गडगुळे, किशोर वराळे, राहुल करपे, गुलाबराव निमसे, राहुल तमनर, शामराव ढोकणे, अमोल शिंदे, गणेश खुळे, रेवन्नाथ बाचकर, विजय उंडे, प्रशांत चव्हाण, कृष्णा तनपूरे, विलास वराळे, सुनील वराळे, निलेश चव्हाण आदि उपस्थित होते.