टोळीयुद्धातून एका गुंडावर गोळीबार केल्याची घटना कोपरगाव शहरात गुरुवारी घडली. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हा दाखल केला असून आठ जणांना अटक केली. सर्व आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जखमी गुंडावर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुन्या वादातून दोन टोळ्यांमध्ये भररस्त्यात भांडण झाले. यानंतर एका टोळीकडून दुसऱ्या टोळीतील गुंडावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
सर्व आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयात हजार केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्व घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरिक्षक भगवान मथुरे तपास करीत आहेत.