
नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील गाडीला वृत्तवाहिनीच्या गाडीची मागून जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये कॅमेरामन जखमी झाला आहे. सदरचा अपघात आज नगर संगमनेर महामार्गावर चिखली या ठिकाणी झाला आहे.
शरद पवार हे आज नगर जिल्हयाच्या दोर-यावर होते. अकोले येथे पवारांचा ताफा चालला असताना ताफ्यासोबत असलेल्या टीव्ही 9 या मराठी या वृत्तवाहिनीची गाडी समोरील फॉर्च्यूनर गाडीला धडकली.
संगमनेर जवळील चिखली येथे हा अपघात घडला. सुदैवाने गाडीतील चालक आणि रिपोर्टरला दुखापत झाली नाही. मात्र कॅमेरामनच्या डोक्याला दखापत झाली आहे.