नगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या भोंगळ काराभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळेच खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली आज (22 जुलै) महाविकास आघाडीने प्रतिकात्मक अंत्यायात्रा काढून पोलीस प्रशासनाचा निषेध केला. तसेच उपोषण करण्याचा निर्णय घेत त्याची आजपासून सुरुवात करण्यात आली.
नगर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या गैरकारभारामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथगाने सुद्धा गैर कारभार केलेला आहे. कहर म्हणजे पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना ब्रिटीश ठरवण्याचा गाठ घातला आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या सुद्धा झालेल्या नाहीत. या सर्वांच्या निषेधार्थ खासदार निलेश लंके यांच्या अदीपत्याखाली महाविकास आघाडीने जिल्हा पोलीस सदस्य कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला व त्याची आजपासून सुरुवात करण्यात आली. तत्पुर्वी नगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले व त्या ठिकाणी पोलिसांच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भगवान फुलसुंदर व गिरीश जाधव, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, अमोल येवले, योगीराज गाडे, प्रशांत गायकवाड, संजय झिंजे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आपण आता आवाज उठवला आहे. पोलीस आपला आवाज दाबण्याची शक्याता आहे. त्यामुळे जे काही आहे ते पारदर्शकपणे जनतेसमोर आणा, असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी केले.