Nagar News – धाकटी पंढरीत खड्ड्यांची पूजा आणि भजन करत वारकऱ्यांचे आंदोलन; रस्त्याच्या दुरवस्थेकडे वेधले लक्ष

जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे ग्रामस्थांनी धनेगाव सोनेगाव या मुख्य रस्त्यावरील खड्ड्याची पूजा करून खड्ड्यात बसून वारकऱ्यांनी भजन केले. हे अनोखे आंदोलन करत वारकऱ्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. हे आंदोलन हभप पद्माकर काळे , हभप बबन भोसले व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट धनेगावचे अध्यक्ष तथा माजी सरपंच भरत बप्पा काळे यांनी केले. खड्ड्याची पूजा करत त्यात बसून भजन करत त्यांनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निषेध नोंदवला.

आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी धाकटे पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेगाव येथील मंदिराचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक आले होते. मराठवाड्याचे प्रवेशद्वार, नगर जिल्ह्याचे शेवटचे टोक, तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या धनेगावची प्रति पंढरपूर म्हणून धाकटी पंढरी अशी ओळख आहे. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. धनेगाव येथे येण्यासाठी सोनेगावहून तीन किलोमीटर पायी चालत गाड्या रस्त्याच्या कडेला लावून काही भाविकांना यावे लागले तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोठे मोठे खड्डे चिखल व अरुंद रस्त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जामखेड तालुक्याला दोन लोकप्रतिनिधी असताना धनेगाव नगरीस विकासापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली. वारकऱ्यांना चिखल तुडवत लांबच्या लांब रांगा लावून मूलभूत सुविधांपासून दुर्लक्षित असणाऱ्या धनेगावमध्ये जावे लागले. त्यातच ठेकेदार प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यानेच एकादशीच्या दिवशीच एका बाजूने रस्ता खोदून ठेवल्यामुळे अनेक भक्त या खड्ड्यात पडले तर काहींच्या गाड्या साईड पट्ट्या खोदलेल्या खड्ड्यामध्ये गेल्याने अनेक समस्यांना भाविकांना सामोरे जावे लागले.

धनेगाव येथे दळणवळणाचा मोठा प्रश्न ग्रामस्थांपुढे आहे. त्यातच एसटी बस सतत बंद, शाळकरी मुलांना बाहेर गावाला शिक्षणासाठी जाताना अडचणीचा सामना करावा लागतो. आजारी पेशंट ,गरोदर महिला, वृद्ध रुग्ण ,शेतीमाल दूध व्यवसायिक आधी दळणवळणाचे गैरसोय होत असल्याने समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच भारत संचार निगमचे मोबाईल सेवा सतत बंद राहिल्यामुळे लोकांचा संपर्क तुटतो. त्यातच अभ्यासक्रम करणारे विद्यार्थ्यांनाही मोबाईलच्या इंटरनेट बंदचा त्रास सहन करावा लागतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मैदानावर पाऊस पडल्यानंतर चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळणे जिकरीचे झाले आहे. गावातीलच राहणाऱ्या आदिवासी पारधी समाजाला पाणी पिण्यासाठी एक किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. अशा विविध स्थानिक प्रश्नांसह ग्रामस्थांसह विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना वाहने असून सुद्धा लांब वर पायी चिकल तुडत यावे लागले. एकेरी व रस्ता असल्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत करावी लागत होते. त्यातच सोनेगाव च्या पुढे धनेगाव पर्यंत साईड पट्टे खोदल्यामुळे सोनेगाव परिसरात वाहने उभी करत भाविकांना प्रति पंढरपूर धनेगाव पर्यंत लहान मुलं , वृद्ध वयस्कर व्यक्तीं, महिलांना चिखल तुडवत दर्शन घेण्यासाठी जाण्याची वेळ या प्रशासन व ठेकेदाराच्या दुर्लक्ष झाल्याने भाविकांनी संताप व्यक्त केला.

धनेगाव ग्रामस्थांनी माजी सरपंच तथा विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भरत बप्पा काळे यांच्यासह ह भ प पद्माकर काळे, ह भ प बबन भोसले, दत्तात्रय काळे, बाळासाहेब काळे, संतोष काळे ,मनोज काळे, रघुनाथ सुरवसे, वैभव बाळासाहेब काळे, गणेश काळे, महेंद्र काळे, योगेश काळे, सुवर्णा जाधव, बाळासाहेब लंबे, बाळासाहेब साठे ,जयश्री जाधव, लक्ष्मण लव्हळे, हिरालाल देशमुख, दादा लंबे, बाळासाहेब लंबे, रणजीत चव्हाण आदी सह ग्रामस्थांनी रस्त्यावर खड्ड्यात भजन म्हणत खराब रस्त्याबद्दल ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध करत भजन गाऊन निषेध नोंदवला.