एन. श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंट्सचे संचालक पद सोडले

एन. श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंट्सच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे यापुढे कंपनीत कोणतेही शेअर होल्डिंग नसेल तसेच ते आता त्याचे प्रवर्तकही नसणार आहेत. इंडिया सिमेंटच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या अल्ट्राटेक सिमेंटने कंपनीतील 55.49 टक्के हिस्सा खरेदी केला. अल्ट्राटेकने दोन टप्प्यांत एकूण 7 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून या करारातील अटींनुसार श्रीनिवासन यांना त्यांचे पद सोडावे लागले.

करारानुसार कंपनीचे माजी प्रवर्तक आणि पत्नी चित्रा श्रीनिवासन, कन्या रुपा गुरुनाथ, ईव्हीएस फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, एसके अशोक बालाजे फायनान्शियल सर्व्हिसेस ट्रस्ट, सिक्युरिटी सर्व्हिसेस ट्रस्ट आणि चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेड यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडे आता इंडिया सिमेंटचे समभाग नाहीत. ते यापुढे कंपनीचे प्रवर्तक किंवा सदस्य नसतील. दरम्यान, 28 जुलै रोजी अल्ट्राटेकने इंडिया सिमेंटमधील 32.72 टक्के हिस्सा खरेदी केला होता. तेव्हा इंडिया सिमेंटमध्ये कंपनीची भागीदारी 22.77 टक्के होती. या करालाला भारतीय स्पर्धा आयोगाने 24 डिसेंबर रोजी मान्यता दिली.