एन श्रीनिवासन यांचा इंडिया सिमेंटच्या सीईओ पदावरून राजीनामा, पत्नी आणि मुलीनेही सोडली कंपनी

एन श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंटच्या सीईओ पदावरून राजीनामा दिला आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने अल्टाट्रेक च्या 7 हजार कोटी रुपयांहून अधिक असलेल्या व्यवहाराला मंजूरी दिल्यानंतर श्रीनिवासन यांनी राजीनामा दिला आहे. या व्यवहरानंतर कुमार मंगलम बिरला यांची अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा इंडिया सिमेंट्स लिमिटेड मध्ये मोठा भाग असणार आहे.

इंडिया सिमेंट्स लिमिटेने दिलेल्या माहितीनुसार हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर एन श्रीनिवासन यांनी वाईस चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पदावरून राजीनामा दिला आहे. त्यासोबतच रेग्युलेटरी फाईलिंगनुसार श्रीनिवासन यांच्या कन्या रुपा गुरुनाथ, पत्नी चित्रा श्रीनिवासन आणि व्हीएम मोहन यांनीही कंपनीच्या बोर्डमधून राजीनामा दिला आहे.

ICL ने दिलेल्या माहितीनुसार 24 डिसेंबर 2024 रोजी हा व्यवहार पूर्ण झाल्यानतंर अल्ट्राटेक कंपनीकडे या कंपनीचा संपूर्म ताबा असणार आहे. कंपनीचे इतर डायरेक्टर्स बालासुब्रमण्यम आदित्यन, कृष्णा श्रीवास्तव, लक्ष्मी अपरणा श्रीकुमार आणि संध्या राजन यांनीही राजीनाला दिला आहे.

चार नवीन डायरेक्टर नियुक्त

बोर्डाने चार नवीन डायरेक्टर नियुक्त केले आहेत. त्यात केसी झंवर, विवेक अग्रवाल, ईआर राज नारयण आणि अशोक रामचंद्रन यांचा समावेश आहे. याशिवाय. इतर तीन स्वतंत्र डायरेक्टर म्हणून अलका भरुचा, विकास बलिया आणि सुकन्या कृपालू यांचाही समावेश असणार आहे.