माझ्या बायकोला रविवारी माझ्याकडे बघायला आवडतं…, अदार पूनावाला L&T च्या चेअरमनला टोला

एल अँड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांनी आठवड्यातील 90 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान आता सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाते CEO अदार पूनावाला देखील आपले मत मांडले आहे. यावेळी त्यांनी महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे. माझी पत्नी नताशालाही वाटते की मी खूप जबरदस्त माणूस आहे. त्यामुळे तिला मला रविवारी पाहावेसे वाटते, असे वक्तव्य अदार यांनी केले.

महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी आठवड्यातील कामाच्या तासांवर भाष्य केलं होत. यामध्ये त्याना त्यांच्या पत्नीकडे पहायला आवडते असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर अदार पूनावाला यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत सहमती दर्शवली आहे. होय, आनंद महिंद्राजी, माझी पत्नी देखील असाच विचार करते. तिला वाटत की मी खूप जबरदस्त माणूस आहे. त्यामुळे जेव्हा मी रविवारी घरी असतो, तेव्हा तिला देखील माझ्याकडे पाहायला आवडते. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेला नेहमी प्राधान्य द्या, त्याच्या वेळेला नाही…, अशी पोस्ट पुनावाला यांनी शेअर केली आहे.

रविवारी बायकोकडे पाहण्याच्या विधानावरून सुब्रमण्यन झाले ट्रोल

एल अँड टीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. “तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता,” असा प्रश्न त्यांनी विचारला होता. तसेच आठवठ्यात 90 तास काम केले पाहिजे, कर्मचाऱ्यांनी रविवारीही सुट्टी घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिला होता. यावरुनच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

‘माझी पत्नी खूप सुंदर, तिला पहायला आवडते’, एसएन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावर आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर