महाविकास आघाडीचा 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला आहे अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. तसेच आज संध्याकाळी किंवा उद्या जागावाटप जाहीर होईल असेही नाना पटोले म्हणाले.
#WATCH | Pune: On seat sharing for #MaharashtraElection2024, Maharashtra Congress chief Nana Patole says, “We came up with the 85-85-85 formula yesterday. Our seat declaration will happen by this evening or tomorrow.” pic.twitter.com/YFRC2ifSMW
— ANI (@ANI) October 24, 2024
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप ठरलं असून तूर्त शिवसेना 85, काँग्रेस 85 आणि राष्ट्रवादी 85 असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. तिन्ही पक्षांमध्ये 270 जागांवर सहमती झाली असून उर्वरित 18 जागांबाबत आघाडीतील इतर घटक पक्षांसोबत उद्यापासून चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली होती.