विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला आहे, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. तसेच महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांची 270 जागांवर सहमती झाली असून 18 जागा मित्र पक्षांना सोडल्या जातील असेही संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघडीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांसोबत आमची बैठक पार पडली. महाविकास आघाडीचे जागावाटप सुरळीत पार पडले आहे. तिनही पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांना सामावून घेणारे आमचे जागावाटप पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीचा 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला असून तीनही पक्ष साधारण 270 जागांवर आमची सहमती झाली आहे. त्याची यादीही आम्ही बनवली आहे. उर्वरीत जागा मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय होईल. या सर्व जागा महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीने लढून सत्तेवर येईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.