भगव्याचा आदर असेल तर मुस्लिमांनाही संघात एण्ट्री! मोहन भागवत यांनी केली भूमिका स्पष्ट

‘भारत माता की जय’ ही घोषणा देण्यास संकोच वाटत नसेल आणि भगव्या ध्वजाचा आदर असेल तर मुस्लिमही राष्ट्रीय संघाच्या शाखेत येऊ शकतात, अशी भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली आहे. जे लोक स्वतŠला औरंगजेबाचे वंशज मानत नाहीत त्या सर्व भारतींयांचं संघाच्या शाखेत स्वागत असल्याचं ते म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत हे 4 दिवसीय वाराणसी दौऱयावर आहेत. यावेळी, भागवत यांनी जातीय भेदभाव नष्ट करण्यासंदर्भात, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेसह अनेक मुद्दय़ांवर आपले मत व्यक्त करत, एक बलशाली समाज निर्माण करण्यासंदर्भात भाष्य केले. त्यावर एका स्वयंसेवकाने मुस्लिम समाजाच्या संघ सहभागासंदर्भात भागवत यांना प्रश्न केला असता, त्यांनी शाखेत सर्व भारतीयांचे स्वागत आहे. मात्र यासाठी एक अट आहे, ती म्हणजे, शाखेत येणाऱया कोणत्याही व्यक्तीला ‘भारत माता की जय’ ही घोषणा देताना संकोच वाटू नये आणि त्याने भगव्या ध्वजाचा आदर करायला हवा, अशी भूमिका मांडली.

भारतीयांचे धर्म वेगळे, पण संस्कृती एकच

भारतातील लोकांचे धर्म वेगवेगळे असले तरी, संस्कृती मात्र सर्वांची एकच आहे. सर्व धर्म, पंथ आणि जातीच्या लोकांचे संघाच्या शाखेत स्वागत आहे, असे भागवत म्हणाले.