
टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क हेच आपल्या मुलाचे वडील असल्याचा दावा अमेरिकेच्या सोशल मीडिया इन्फ्लुन्सरने केला आहे. एश्ले क्लेयर असे या इन्फ्लुएन्सरचे नाव असून तिने पाच महिन्यांपूर्वी एका मुलाला जन्म दिला, परंतु सुरक्षितता आणि गुप्तता म्हणून तिने याबाबतची घोषणा केली नव्हती. क्लेयरचा दावा खरा ठरला तर मस्क यांचे हे 13 वे अपत्य असेल. दोन पत्नी आणि तीन गर्लफ्रेंडची मिळून मस्क यांची 12 अपत्ये आहेत.
मुलाला एक सुरक्षित वातावरण देण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे आमच्या खासगी गोष्टींबद्दल गुप्तता राहूद्या. आमच्या खासगी जीवनाचा सन्मान करावा, अशी विनंती असल्याचे क्लेयरने म्हटले आहे.
उत्तम आयक्यू असलेल्या लोकांनी अधिकाधिक मुले जन्माला घालावीत, असे मस्क यांनी 2021 मध्ये म्हटले होते. जर आपण जास्त मुले जन्माला घातली नाहीत तर आपली संस्पृती नष्ट होईल, असे मस्क यांनी नमूद केले होते. दरम्यान, मस्क सध्या न्यूरालिंकची व्यवस्थापक शिवॉन जिलिसलसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांची तीन मुले आहेत. गेल्या वर्षी मस्क 12 व्या मुलाचे वडील बनले.
क्लेयरचे दहा लाख एक्स फॉलोअर्स
26 वर्षांच्या एश्ले सेंट क्लेयर एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि लेखिका आहे. तिने एलिफंड्स ऑर नॉट बर्डस् नावाचे पुस्तक लिहिले आहे. मीडिया रिपोर्टस्नुसार न्यूयॉर्पमधील सर्वात महागडा परिसर मॅनहॅटनमध्ये ती राहते आणि परंपरागत विचारांना मानते. ‘एक्स’वर तिचे तब्बल दहा लाख फॉलोअर्स आहेत. ती एका आलिशान घरात राहते. या घराचे महिन्याचे भाडे तब्बल 13 लाख रुपये इतके आहे. टेस्ला सायबर ट्रक असणाऱयांमध्ये क्लेयरचाही नंबर लागतो.