‘पद्मश्री’ संगीतकार वसंत देसाई यांच्या 49 व्या स्मृतिदिनानिमित्त संगीतकार सोमनाथ परब आणि युवा कला मंचच्या वतीने ‘एक सूर, एक ताल’ या संगीत कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात येणार आहे. रविवार, 22 डिसेंबरला सकाळी 8.30 वाजता दादरमधील वसंत देसाई चौक, समर्थ व्यायामशाळेच्या जवळ आयोजित केला आहे. कार्यक्रमात 400 विद्यार्थी, शिक्षक, शालेय विद्यार्थी, युवा कला मंच तसेच स्वरांगण गीत समूहाच्या वतीने संगीतकार वसंत देसाई यांची गाणी सादर केली जाणार आहेत. संगीत महर्षी वसंत देसाई यांच्या संगीत क्षेत्रातील योगदान रसिकांसमोर यावे यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. संपर्क – 9820783804.
घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे श्री सिद्धी गणेश मंदिर व लायनेस क्लब ऑफ पंतनगर यांच्या सौजन्याने विभागातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या वतीने प्रेसिडेंट उषा दोशी, मुख्य अतिथी ज्योती मेहता, माजी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ज्योती भुता, सहखजिनदार सीमा शाह, माजी प्रेसिडेंट गिरीबाला शाह, माजी प्रेसिडेंट सरोज विज, प्रोजेक्ट असिस्टंट कोकिळाबेन पोरिया, रेणुका शाह तसेच मंडळाचे विश्वस्त दशरथ शिर्पे व मधुसूदन साळुंखे तसेच शैलेश शिंदे, वसंत शिंदे, दीपक राणे, बबन कुऱहाडे, व्यंकटेश पाटील उपस्थित होते.