
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना तातडीने चेन्नईतील ग्रीम्स रोडवरील प्रसिद्ध अपोलो रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरखेखाली उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडे सात वाजता ए. आर. रहमान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरखेखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्यावर एंजियोग्राफी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्यापही त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीए.