बापलेकाची हत्या केल्याप्रकरणी दोन भावांना अटक, मुर्शिदाबाद हिंसाचार; आतापर्यंत 221 जणांना अटक

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिह्यात झालेल्या हिंसाचारादरम्यान बापलेकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी आज पोलिसांनी दोन भावांना अटक केली असून कालू नादर आणि दिलदार नादर अशी आरोपींची नावे आहेत. ते हत्या झाली त्या जाफ्राबाद भागातील रहिवासी आहेत. वक्फ (दुरुस्ती) कायद्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 221 जणांना अटक करण्यात आली आहे. बापलेकाच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. कालू याला बीरभूम जिह्यातून तर दिलदार याला मुर्शिदाबाद जिह्यातील सुती येथे हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर पकडण्यात आले. परिसरातील सीसीटीव्ही तपासून या घटनेत सहभागी असलेल्या इतर लोकांची ओळख पटवली आहे.