घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिलो…; अभिनेत्याने सांगितली यशामागची कहाणी

बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ने प्रेक्षकांना वेड लावले. कमी बजेटमध्ये आणि स्टार पॉवरशिवाय बनलेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. यासह ‘मुंज्या’ने बॉक्स ऑफिसवर अनेक आठवडे राज्य केले. 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पाही पार केला आहे. चित्रपटाच्या जबरदस्त यशाचे संपूर्ण श्रेय त्याची मजेदार संकल्पना, लोककथा आणि भयपट यांचे मिश्रण तसेच बहुचर्चित मुख्य अभिनेता अभय वर्माला देण्यात आले आहे. मात्र अभयचा एक सुपर स्टार बनण्याचा प्रवास काही सोपा नव्हता.

अलीकडेच दैनिक भास्करला अभयने मुलाखत दिली. आपल्या यशस्वी होण्यामागच्या काही गोष्टींची माहिती त्याने दिली. ‘माझे वडील ज्वेलरीचे दुकान चालवायचे. मी सहावीत असताना त्याच्या वडिलांना कावीळ झाली. ज्यामुळे त्यांच्या यकृतावर गंभीर परिणाम झाला. त्यामुळे वडिलांना अशा अवस्थेत काम करणे कठीण होते. म्हणून माझ्या आईने आमच्या घराची संपूर्ण जबाबदारी घेतली. नंतर बाबाचे आजारपण, माझे शिक्षण अशा वाढत्या खर्चामुळे आम्ही उदरनिर्वाहासाठी घर विकले आणि तीन वर्षांतच माझ्या वडिलांचे निधन झाले, असे अभयने या मुलाखतीत सांगितले.

गुजारा करने के लिए बेचना पड़ा घर, ट्रांसजेंडर बनकर सडकों पर भी रहा, अब इस एक्टर ने दे डाली 100 करोड़ी फिल्म

… तीन महिने ट्रान्सजेंडर म्हणून राहिलो

अभय अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईत आला. त्याचा मोठा भाऊ अभिषेकनेही टीव्ही शोमध्ये काम केले होते. काही संघर्षानंतर अभयला चित्रपटात काम करण्याच्या संधी मिळू लागल्या. 2022 मध्ये त्याने सफेद चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारण्यासाठी साइन केले. या भूमिकेच्या तयारीसाठी अभय वाराणसीला गेला आणि तिथे ट्रान्सजेंडर म्हणून अनेक आठवडे राहिला. संदीप सिंग दिग्दर्शित Safed हा चित्रपट गेल्या वर्षी ZEE5 वर स्ट्रीम झाला होता.