पालिकेने जाहीर केली मालमत्ता कर थकबाकीदारांची दुसरी यादी, 222 कोटींचा कर थकवला

पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेला मालमत्ता कर थकवणाऱ्या ‘टॉप टेन’ थकबाकीदारांची दुसरी यादी पालिकेने आज जाहीर केली. या दहा थकबाकीदारांनी पालिकेचे तब्बल 222 कोटी मालमत्ता कर थकवला आहे. या थकबाकीदारांना पालिकेने जप्तीची नोटीस बजावली असून विहित मुदतीत कर भरणा केला नाही तर मालमत्तेचा लिलाव करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मालमत्ता कर देयके  मिळाल्यापासून 90 दिवसांच्या आत जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास पालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. पालिकेच्या करनिर्धारण व संकलन  खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी  पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात  मालमत्ता धारकास 21 दिवसांची अंतिम नोटीस  दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची  मालमत्ता जप्ती,  लिलाव आदी कारवाई केली जाते. यानुसार पालिकेकडून कलम 203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात आली असून मुंबई पालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदर मालमत्तेवर कलम 204, 205, 206 अन्वये प्रथमतŠ मालमत्तेतील चीज वस्तू जप्त करून लिलाव केला जाईल. जप्त चीजवस्तूतूनही कर वसूल झाला नाही तर कलम 206 अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल, असे नोटिसीद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. पालिका आयुक्त प्रशासक  भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि सहआयुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.

हे आहेत थकबाकीदार

n मेसर्स एचडीआयएल लिमिटेड (एच पूर्व विभाग) ः        31 कोटी 68 लाख 51 हजार 398 रुपये

n कमला मिल्स लिमिटेड (जी दक्षिण विभाग)       ः        30 कोटी 82 लाख 62 हजार 166 रुपये

n मेसर्स वाधवा डिझर्व्ह बिल्डर (एम पूर्व विभाग)   ः        26 कोटी 24 लाख 29 हजार 665 रुपये

n कमला मिल्स लिमिटेड (जी दक्षिण विभाग)       ः        23 कोटी 64 लाख 19 हजार 834 रुपये

n गोविंदराम ब्रदर्स लिमिटेड (के पश्चिम विभाग)   ः        22 कोटी 30 लाख 67 हजार 050 रुपये

n हीज होलीनेस सरदार ताहीर सैफुद्दीन साहिब (डी विभाग)           ः        19 कोटी 90 लाख 244 रुपये

n गॅलेक्सी कॉर्पेरेशन (एच पश्चिम विभाग)            ः        18 कोटी 66 लाख 81 हजार 494 रुपये

n सूरज हांडा, विष्णुप्रसाद (के पश्चिम विभाग)       ः        18 कोटी 12 लाख 18 हजार 913 रुपये

n अरिस्टो डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एम पूर्व विभाग)   ः        16 कोटी 05 लाख 93 हजार 419 रुपये

n ओंकार डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड (जी दक्षिण विभाग) ः    14 कोटी 87 लाख 59 हजार 582 रुपये