
30 वर्षीय गतिमंद तरुणीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली आहे. नराधम रिक्षाचालकाने पीडित तरुणीला मुंब्रा येथील निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केले, याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी रिक्षाचालक फैजल खान (32) याला अटक केली असून कल्याण न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्याने महाराष्ट्रात माता-भगिनींच्या अब्रूचे अक्षरशः धिंडवडे निघत आहेत.
पीडित तरुणी सोमवारी डोंबिवली पूर्वेतील आपल्या घरातून सोनारपाडा परिसरातील नातेवाईकांकडे रिक्षातून जात होती. मात्र रिक्षाचालकाने तिला सोनारपाडा येथे न नेता तिच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन तिला मुंब्रा येथील एका निर्जनस्थळी नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर काही वेळातच पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती नातेवाईकांना दिली. यानंतर कुटुंबियांनी टिळकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
सीसीटीव्हीच्या आधारे बेड्या
सोनारपाडा रोडपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना संशयित रिक्षाचालकाच्या रिक्षाचा नंबर मिळाला. त्या आधारे पोलिसांनी आरोपीचा पत्ता शोधून काढला. कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदम व त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री आरोपी फैजल खान याला दिवा येथून अटक केली.
अल्पवयीन कॅन्सरग्रस्त मुलीवर बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचार
कुटुंबीयांना मदत करण्याच्या बहाण्याने एका विकृताने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही 13 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याचे उघड झाल्यानंतर मुलीवर अत्याचार करणारा नराधम बिहारला पळून गेला होता. मात्र पोलिसांनी बिहारमधून त्याला बेड्या ठोकून बदलापुरात आणले आहे.
बिहारमधल्या पीडित मुलीला काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी उपचारासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी गावातील सूरज सिंग त्यांच्या मदतीसाठी मुंबई आला. त्याच्या मदतीने मुलीचे कुटुंबीय बदलापुरात आले. सूरज सिंग याने भाड्याने घर घेऊन दिले. उपचाराच्या निमित्ताने सूरजची अनेकदा संबंधित कुटुंबीयांच्या घरी ये जा होती. याचाच गैरफायदा घेऊन सूरज सिंग याने तीन ते चार वेळा मुलीवर अत्याचार केले. उपचार सुरू असताना करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीदरम्यान ही मुलगी गर्भवती असल्याची बाब समोर आली.
याप्रकरणी मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करण्यात आली होती. पुढे ही तक्रार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आली. यानंतर सूरज सिंग बिहारला पळाला. पोलिसांनी सखोल चौकशी करत सूरज सिंग हाच आरोपी असल्याची खात्री झाली. यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथक तयार केले आणि सूरज सिंग याला बिहारमधून अटक केली.
मुंब्रा पोलिसांनी रिक्रिएट केला सीन
सहाव्या मजल्यावरून फेकून देणारा नराधम आसिफ मन्सुरी याच्या क्रूरकर्माचा पर्दाफाश करण्यासाठी आज पोलिसांनी संपूर्ण सीन रिक्रिएट केला. तो मुलीला कुठे भेटला, इमारतीत कसा घेऊन गेला, त्याने तिच्यावर अत्याचार केल्यानंतर हत्या कशी केली, कोणते शस्त्र वापरले आणि तिला सहाव्या मजल्यावरून खाली कसे फेकले याची माहिती गोळा केली. दरम्यान न्यायालयाने नराधमाला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नराधम आसिफ मन्सुरी याने 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार व हत्येचा उलगडा झाल्यानंतर मुंब्र्यासह संतापाची लाट उसळली होती. दरम्यान सर्वधर्मीय राज्यावसायाचा सराय द्या, अशी मागणी केली होती. नागरिकांच्या या भावना लक्षात घेत पोलिसांनी नराधम मन्सुरीला पुन्हा घटनास्थळी नेले. यावेळी पोलिसांनी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी संपूर्ण घटना रिक्रिएट केली. सीन रिक्रिएटदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जनप्रक्षोभ उसळू नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. या सीन रिक्रिएशनदरम्यान मुंब्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.