मुंबईकरांना 7 दिवस पाणी बिले भरता येणार नाहीत

अ‍ॅक्वा जलआकार प्रणालीच्या सर्व्हरवरील माहिती क्लाऊड सर्व्हरवर पाठवण्याचे काम महापालिकेच्या जल विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे बुधवारी 9 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजेपासून ते मंगळवार, 15 एप्रिलपर्यंत सकाळी 9 वाजेपर्यंत जल अभियंता विभागाची ’अॅक्वा’ ही जलआकार बिले आणि संकलन प्रणाली पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या 7 दिवसांत मुंबईकरांना ऑनलाईन पाणी बिले भरता येणार नाहीत.