चित्रांमधून पौराणिक कथांचा शोध; सुकांता दास यांचे सोलो प्रदर्शन

चित्रांमधून पौराणिक कथा शोधणारे प्रसिद्ध कलावंत सुकांता दास यांचे सोलो प्रदर्शन पाहण्याची संधी मुंबईकर रसिकांना मिळणार आहे. ‘अहम’ असे प्रदर्शनाचे नाव आहे. प्रदर्शनात महाभारत, रामायण या महाकाव्यांसह पुराणातील दंतकथेपासून प्रेरित चित्रे दिसणार आहेत. त्यांचे कार्य पारंपरिक कथाकथनाच्या पलीकडील आहे. त्यांच्या चित्रात प्राचीन कथा विविध रंगात आधुनिक संवेदनशीलतेने उमटतात. ‘अहम’ प्रदर्शनाचे उद्घाटन 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता ताज आर्ट गॅलरी, ताज महल पॅलेस येथे होईल. त्यानंतर 19 आणि 20 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत प्रदर्शन पाहता येईल. त्यानंतर ‘अहम’ 21 डिसेंबर ते 15 जानेवारीदरम्यान, सुअन आर्टलँड गॅलरी, कॉमर्स हाऊस, काळा घोडा येथे प्रदर्शन पाहता येईल. सकाळी 11 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत प्रदर्शन खुले राहील.