Mumbai: मंदिरातील आरतीला विरोधकरणाऱ्यांना जोरदार उत्तर; जब्रेश्वर मंदिरात शिवसेनेकडून महाआरती

mumbai-walkeshwar-jabreshwar-mahadev-temple-aarti-shiv-sena-ubt

मुंबईतील वाळकेश्वर येथील जब्रेश्वर महादेव मंदिरातील आरतीवर काही स्थानिकांनी आक्षेप घेत त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत. आरती बंद करण्याची मागणी केली. या विरोधात जब्रेश्वर महादेव मंदिरातील भाविकांनी आवाज उठवला आहे. याच दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जब्रेश्वर महादेव मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्याप्रमाणात भाविक उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार जब्रेश्वर महादेव मंदिरात दर सोमवारी होणाऱ्या आरतीला स्थानिक हाऊसिंग सोसायट्यांमध्ये राहणाऱ्यांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत. या आरतीसाठी मुंबई-ठाण्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. मात्र काही स्थानिक लोक मंदिराला, हिंदूंना त्रास देत आहेत असं पाहायला मिळत आहे.

मुंबईतील वाळकेश्वर बाणगंगा परिसराजवळच जबरेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास म्हणजे 1840 मध्ये स्थापना करण्यात आलं. या मंदिरात दर सोमवारी रात्री 9 ते 9.30 या वेळेत म्हणजे अर्धा तास आरती करण्यात येते. या आरतीवेळी नगारा व शंख ध्वनी करण्यात येतो. यावर काही स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच आरतीसाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या येणाऱ्या गाड्यांवर देखील स्थानिक हाऊसिंग सोसायट्यांमधील काही रहिवाशांनी आक्षेप घेतला होता. पोलीस नियंत्रण कक्षाला फोनवरून तक्रारी गेल्या होत्या. हा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे.

दरम्यान, सोमवारी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 च्या वतीने वाळकेश्वर येथील श्री जब्रेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी शिवभक्तांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.