मुंबई वॉकेथॉनला मुंबईकरांची उत्स्फूर्त ‘चाल’

मुंबई वॉकेथॉनच्या पहिल्या हंगामात मुंबईकरांनी उत्स्फूर्त चाल करत आपला चालण्याचा आनंद द्विगुणीत केला. फिटनेससाठी नेहमीच जॉगिंग करण्यासाठी तब्बल पाच हजारांपेक्षा अधिक मुंबईकरांनी आपणही चालबाज असल्याचे दाखवून दिले. या पहिल्यावहिल्या वॉकेथॉनला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी झेंडा दाखवला. याप्रसंगी महाराष्ट्र नौदलाचे अनिल जग्गी, माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, फास्ट अॅण्ड अपचे सीएफओ शिल्पा खन्ना, विनय भारतीय उपस्थित होते. या वॉकेथॉनमध्ये 10 किमीचा प्रो-वॉक, 5 किमीचा फॅमिली वॉक आणि 3 किमीचा फन वॉक या प्रकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे या वॉकेथॉनमध्ये पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग अधिक होता. आता मुंबई वॉकेथॉनच्या धर्तीवर दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, पुणे आणि अहमदाबाद येथेही वॉकेथॉनचे आयोजन केले जाणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.