Mumbai T-20 victory parade – मरीन ड्राईव्हवर 5 जीप भरून चपला अन् 2 डंपर कचरा महापालिकेने केला स्वच्छ

मुंबईतील मरीन ड्राईव्हमध्ये टी -20 येथे विश्वचषक जिंकणाऱ्या विजयी संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या विजयोत्सवात टीम इंडियाचे आनेक चाहते आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते. या टीम इंडियाच्या विजयी मिरवणूकीनंतर रस्त्यावर चपलांचा आणि कचऱ्याचा खच पडलेला दिसत होता. टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या विजयोत्सवात क्रीडा चाहत्यांचा जनसागर उसळला होता. त्यानंतर रस्त्यावर सर्वत्र कचऱ्याचे आणि चपलांचे साम्राज्य परसलेले होते.

टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत आलेल्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी आणि विजयी मिरवणुकीसाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. गुरुवारी संध्याकाळी ही परेड ही विजयी मिरवणूक सुरू झाली. क्रिकटमधील विश्वविजयाचा जल्लोष आणि विजयी टीम इंडियातील खेळाडूंना पाहण्यासाठी आलेले सरव्जण भारावले होते. या जल्लोषानंतर अनेकांच्या चप्पला रस्त्यावर पडलेल्या दिसत होत्या. मुंबई महापिलेकने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 5 जीप भरून चपला आणि बाटल्यांचा खच तर 2 डंपर्स कचरा गोळा केला आहे. या स्वच्छता मोहिमेत काही स्वंयंसेवी संस्थाही सहभागी झाल्या होत्या.

मुंबई महापालिकेने सात वाहने आणि 100 कर्मचाऱ्यांना घेत येथील स्वच्छता केली. नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) ते वानखेडे स्टेडियमपरयंत ही मिरवणूक होती. सुमारे दीड तास ही मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत झालेल्या प्रचंड गर्दीमुळे नंतर येथील रस्त्यांवर कचऱ्याचा खच पडला होता. त्यात खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या आणि चपला यांची संख्या सर्वाधिक होती. स्वच्छता मोहिमेदरम्यान इतर कचऱ्यासह चप्पला मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आल्या.

चपला आणि पाण्याच्या बाटल्यांनी पाच जीप भरल्या होत्या. तर इतर कचरा वाहून नेण्यासाठी दोन डंपर वापरण्यात आले. गुरुवारी रात्री 11.30 वाजता ही स्वच्छता मोहिम शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होती. हा कचरा डंपिंग ग्राउंडवर पाठवण्याऐवजी या सर्व वस्तू पुनर्वापर करणाऱ्या प्लांटमध्ये पाठवल्या जातील. त्यामुळे त्याचा पुर्वापर शक्य होणार आहे, असे महापालिकने सांगितले. महापालिका आणि स्वयंसेवी संस्थानी तत्परतेने केलेल्या या स्वच्छतेचे कौतुक होत आहे. तसेच या मिरवणुकीसाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.